Vadgaon Maval News : नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; मावळ भाजपची मागणी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री असलेले नवाब मलिक यांना अटक झाली आहे. मलिक यांचे कृत्य म्हणजे राष्ट्रविरोधी शक्तींना मदत करण्यासारखे आहे, त्यामुळे तातडीने नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. या मागणीसाठी मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने वडगाव येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

ज्या दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणले, वेळोवेळी विघातक कृत्यांना चालना दिली त्या व्यक्तीशी कुठलेही आर्थिक व्यवहार म्हणजे देशद्रोह असून अशा व्यक्तीस मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असे माध्यमांशी बोलताना सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष रविंद्र आप्पा भेगडे,माजी सभापती गुलाब म्हाळसकर,माजी उपसभापती शांताराम कदम,माजी उपसभापती दत्तात्रय शेवाळे,तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण,सरचिटणीस मच्छिंद्र केदारी, वडगांव नगरपंचायतचे नगरसेवक प्रवीण चव्हाण,युवा मोर्चा कार्याध्यक्ष गणेश ठाकर, विध्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,सहकार आघाडी अध्यक्ष अमोल केदारी,वडगाव शहर अध्यक्ष अनंता कुडे,कामशेत शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण शिंदे, वडगाव शहर युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे, नामदेव भसे, अमोल धिडे,संस्कार चव्हाण आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.