India Corona Update : गेल्या 24 तासांत 13,166 कोरोना रुग्णांची नोंद, 302 मृत्यू

एमपीसी न्यूज – गेल्या 24 तासांत देशभरात 13 हजार 166 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 302 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 1.28 टक्के एवढा झाला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 4 कोटी 28 लाख 94 हजार 345 एवढी झाली आहे. त्यापैकी 4 कोटी 22 लाख 46 हजार 884 रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.49 टक्के एवढा झाला आहे.

देशात सध्याच्या घडीला 1 लाख 34 हजार 235 ॲक्टिव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजवर 5 लाख 13 हजार 226 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.19 टक्के एवढा झाला आहे.

ICMR च्या आकडेवारी नुसार आजवर 76.45 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 10.33 नमूने तपासण्यात आले आहेत. देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 176 कोटी 86 लाख 89 हजार 266 जणांना लस टोचण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.