Pavana Dam : पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवड शहरासह मावळ वासियांची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. पवना धरण परिसरात मागील 24 तासात 46 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील (Pavana Dam) पाणीसाठा 1.98 टक्क्यांनी वाढला आहे.

 

 

Crime News : नांदायचे असेल तर 50 लाख घेऊन ये म्हणणाऱ्या सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

 

पिंपरी चिंचवड शहारासह मावळ तालु्क्यातील विविध गावांचा पाण्याचा मुख्या स्रोत पवना धरण (Pavana Dam) आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहरला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बांधर्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करून शहवासियांना पाणी पुरवठा केला जातो.

 

 

 

पवना धरणातील परिस्थिती 
गेल्या 24 तासात झालेला पाऊस  : 46 मिमी.

 

1 जूनपासून झालेला पाऊस : 1545 मिमी.

 

गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस : 1471 मिमी.

 

धरणातील सध्याचा पाणीसाठा : 76.22 टक्के

 

गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा : 71.74 टक्के

 

गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
: 1.98 टक्के

 

आजची पाण्याची आवक: 5.08 द. ल. घ. मी

 

आजपर्यंत पाण्याची आवक: 146.17 द. ल. घ. मी

 

धरणतील पाण्याचा उपयुक्त पाणीसाठा : 183.70 द. ल. घ. मी

 

धरणातील पाणी पातळी: 610.57 मीटर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.