Crime News : नांदायचे असेल तर 50 लाख घेऊन ये म्हणणाऱ्या सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – नांदायचे असेल तर 50 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ (Crime News) करणाऱ्या पती व सासरच्या मंडळी विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 29 सप्टेंबर 2019 पासून आजअखेरपर्यंत घडत होता.

यावरून पोलिसांनी पती अमिर अलिकदर खान (वय 31),  उम्मतुनिशी अलिकदर खान (वय 65), शाहिद अलिकदर खान (वय 35), महिला 34, अफताब अलीकदर खान (वय40), मेहबूब अलीकदर खान (वय 45) (सर्व राहणार मिरा रोड, मुंबई) यांच्या विरोधात निगडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra Politics : निवडणूक आयोगापुढे आठ ऑगस्टला ठाकरे, शिंदे यांचे शक्तीप्रदर्शन

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लग्न झाल्यापासून पती त्यांच्याशी अनैसर्गिक पद्धतीने  शारीरिक  संबंध ठेवत होता, तसेच दिर महेबूब यांच्याकडे पतीची तक्रार केली असता त्यानेही फिर्यादीशी (Crime News) गैरवर्तन केले. सर्व आरोपी हे फिर्यादी यांना हुंडा म्हणून माहेरून 50 लाख रुपये आण, दुबईला जाण्याची तयारी ठेव म्हणत तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस याचा पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.