Maharashtra Politics : निवडणूक आयोगापुढे आठ ऑगस्टला ठाकरे, शिंदे यांचे शक्तीप्रदर्शन

एमपीसी न्यूज – शिवसेनेतील फुटीचा वाद सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ निवडणूक आयोगाकडे गेला आहे. शिवसेनेत वर्चस्व कोणाचे हे कागदोपत्री आठ ऑगस्टपर्यंत सिध्द करावे, असा आदेश निवडणूक आयोगाने (Maharashtra Politics)  पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिला आहे.

 

 

शिवसेनेतील बंडानंतर एकनाश शिंदे यांनी संघटनेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळावे, असा अर्ज शिंदे यांनी निवडणुक आयोगाकडे केला होता. त्यानुसार निवडणुक आयोगाने पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष संघटनेतील बहुमत किंवा वर्चस्व सिध्द करावे, असा आदेश दिला आहे. आठ ऑगस्टला दुपारी एकपर्यंत कागदोपत्री पुरावे सादर करण्याचा  (Maharashtra Politics) आदेश दोन्ही गटांना देण्यात आला आहे.1968 च्या निवडणूक चिन्ह नियमावलीतील 15 व्या कलमानुसार ही नोटीस दोन्ही गटांना बजाविण्यात आली आहे.

 

 

निवडणुक आयोगाचे अधिकार काय आहेत

 

मान्यताप्राप्त राजकीय पक्षामध्ये फूट पडल्यास निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल 1968 च्या निवडणूक चिन्ह नियमात स्पष्ट तरतूद आहे. राजकीय पक्षात फूट पडल्याचा दावा दोन्ही किंवा त्यापेक्षा अधिक गटांनी केला आणि निवडणूक आयोगाची तशी खात्री झाल्यास आयोगाकडून मूळ पक्ष व फुटीर गटांनी नोटीस बजावली जाते. मूळ पक्ष व फुटीरांनी सादर केलेले दावे आणि कागदपत्रांची निवडणूक आयोगाकडून पडताळणी केली जाते. त्यानंतर दोन्ही गटांच्या (Maharashtra Politics) नेत्यांना सुनावणीसाठी संधी दिली जाते. या सुनावणीच्या वेळी दोन्ही गटांना आपली बाजू मांडता येते. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यावर निवडणूक आयोगाकडून मूळ पक्ष कोणता किंवा चिन्ह कोणत्या गटाकडे जाते, याचा आदेश दिला जातो.निवडणूक आयोगाचा आदेश दोन्ही गटांवर बंधनकारक असतो.

 

 

धनुष्यबाण गोठविणे हाच शिंदे गटाचा उद्देश

 

मुंबई, ठाण्यासह 14 महापालिका, 200 च्या आसपास नगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका सवकरच आहेत. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले जावे, हाच मुख्यमंत्री एकनाश शिंदे गटाचा उद्देश आहे. त्यासाठी भाजपकडून पडद्याआड सारी मदत केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून (Maharashtra Politics) केला जात आहे. खासदार, आमदार आणि नगरसेवकांमध्ये फूट पडली असून पक्षाचे पदाधिकारी आमच्या बाजूने आहेत, असे चित्र सुनावणीच्या वेळी निर्माण करुन धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे गटाकडे राहणार नाही, अशी शिंदे गटाची खेळी असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यास मतदारांपर्यंत नवीन चिन्ह पोचविण्याचे आव्हान उध्दव ठाकरे यांच्या पुढे असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.