Crime News : पतीसाराखी वागणूक देत नाही म्हणून पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – मला पतीसारखी वागणूक देत नाही म्हणत पतीने थेट पत्नीचा गळा दाबून मारून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 23) पहाटे साडेतीन वाजता रहाटणी (Crime News)  येथे घडला. वाकड पोलीसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

 

रुपेश मच्छिंद्र साबळे (वय 32 रा. रहाटणी) असे अटक आरोपीचे नाव असून पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Chinchwad News : शिवसेनेचे माजी नगरसेवक मधुकर बाबर यांचे निधन

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या काही वर्षांपासून आरोपी हा पिडीतेला त्रास देत होता. तसेच मोठ्या मुलाच्या नावापुढे माझे नाव का लावत नाही, तू मला पतीसारखी वागणूक देत (Crime News) नाही म्हणून सतत भांडत असे. यातून शनिवारी पहाटे फिर्यादी झोपल्या असताना आरोपीने त्यांना मारहाण व शिवीगाळ करत त्यांचा गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.यावरून वाकड पोलीस ठाण्यात पतीवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीसांनी आरोपीला अटक केले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.