New Delhi News : दिवसा रात्री फडकविता येणार तिरंगा; केंद्राचे ध्वज संहितेत बदल

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने रविवारी देशाच्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दिवसा आणि रात्री देखील तिरंगा फडकविता येणार आहे. पॉलिस्टरपासून तयार  (New Delhi News)  केलेल्या तसेच मशीनवर तयार करण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाला वंदनही करता येईल.

 

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे (New Delhi News) औचित्य साधत केंद्राने 13 ते 15 आगस्ट या काळात ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर ध्वज संहितेमध्ये करण्यात आलेले बदल महत्वपुर्ण मानले जात आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व मंत्रालये आणि विभागांना याबाबतचे पत्र पाठविले आहे.

 

Maharashtra Politics : निवडणूक आयोगापुढे आठ ऑगस्टला ठाकरे, शिंदे यांचे शक्तीप्रदर्शन

 

 

राष्ट्रध्वज वंदनाबाबतचे नियम हे भारतीय ध्वज संहिता 2022 आणि राष्ट्रीय सन्मानांचा अवमान प्रतिबंधक कायदा 1971 अंतर्गत निश्चित करण्यात आले आहेत. आता 2002 च्या ध्वज संहितेमध्ये बदल करण्यात आले आहेत. याआधी केवळ सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वज फडकविता (New Delhi News) येत असे तसेच मशीनवर तयार करण्यात आलेले तसेच पॉलिस्टरचे राष्ट्रध्वजाला परवानगी दिली जात नसे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.