Pune News : हिंद केसरी अभिजित कटके यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज : हिंद केसरी मल्ल विजेता अभिजित कटके यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धनादेश ,मानाची गदा ,शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (Pune News) अभिजित कटके यांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपये आणि बाळासाहेबांची शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दोन लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य केले आहे.

यावेळी पुणे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्यासह जिल्हाप्रमुख उल्हास तुपे , सचिन तरवडे ,करण भानगिरे ,आकाश भानगिरे ,अमित दाभाडे उपस्थित होते.

Pimpri News : पीसीसीओई भरती मेळाव्यात 105 कंपन्या आणि 4,200 उमेदवारांचा सहभाग

.नाना भानगिरे म्हणाले,अभिजित कटके यांनी मिळवलेल्या यशाने राज्याच्या नावलौकिकात भर पडली असून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवावे त्यासाठी कोणत्याही मदतीसाठी आम्ही कटीबद्ध असून कटके यांना राज्य सरकारने नोकरी द्यावी अशी मागणी करणारे निवदेन मुख्यमंत्र्यांना दिल्याचे भानगिरे यांनी सांगितले.

अभिजीत कटके हे पुण्यातील शिवरामदादा तालीम येथे सराव करतात. यापूर्वी अभिजितने महाराष्ट्र केसरी, भारत केसरी किताब जिंकला. महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी, (Pune News) रुस्तम ए हिंद दोन्ही किताब मिळवणाऱ्या दिनानाथ सिंह, दादु चौगुले , हरिश्चंद्र बिराजदार , विनोद चौगु , अमोल बुचडे यांच्या पंक्तीत अभिजित कटके आता विराजमान झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.