Hinjawadi Crime : हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर हिंजवडी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 हजार 960 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई बावधन येथील ग्रीन हाऊस हॉटेलवर गुरुवारी (दि. 12) रात्री सव्वा आठ वाजता करण्यात आली.

अभिजित अशैक शिवतारे (वय 30), पंकज पांडुरंग कडू (वय 32, दोघे रा. वारजे माळवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक गणेश बबु शिंदे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ग्रीन हाऊस हॉटेल मध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालवले. हिंजवडी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला. यात पोलिसांनी तीन हुक्का पॉट, तीन हुक्का पाईप, हुक्का पिण्याचे साहित्य, चार हुक्का फ्लेवर बॉक्स असा एकूण 2 हजार 960 रुपयांचा ऐवज जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.