Hinjawadi Crime News : बनावट कागदपत्रांद्वारे जमिनीची परस्पर विक्री

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्रे तयार करून खोट्या व्यक्‍तींना उभे करून 48 गुंठे जमिनीची परस्पर विक्री करण्यात आली. याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मे 2021 ते जून 2021 या कालावधीत दुय्यम रजिस्टर कार्यालय, मेझा 9 चौक, हिंजवडी येथे घडली.

प्रितम सुरेंद्र पाषाणकर (वय 44, रा. सोलापूर रोड, हडपसर, पुणे) यांनी सोमवारी (दि. 16) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उत्तुंग कृष्णराव पाटील (वय 28, रा. रहाटणी), प्रितम आणि त्यांचे वडिल सुरेंद्र यांच्या नावाने उभे केलेले तोतया व्यक्‍ती (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रितम पाषाणकर यांची गोडांबेवाडी, ता. मुळशी या ठिकाणी 48 गुंठे जमिन आहे. आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी प्रितम आणि त्यांचे वडिल सुरेंद्र यांच्या नावाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार केले. तसेच तोतया व्यक्‍तींना उभे करून खोट्या सह्या, फोटो वापरून फिर्यादी व त्यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीची परस्पर विक्री करून फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.