Hinjawadi Crime News : आधाराच्या काठीने ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – भाजी आणण्यासाठी बाजारात गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाची जाणीवपूर्वक खोड काढून त्यांचीच काठी घेऊन त्यांना एकाने बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 3) सायंकाळी महाळुंगे-पाडाळे येथे घडली.

नाथा किसन ससाणे (वय 80, रा. महाळुंगे-पाडाळे, ता. मुळशी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुनीराज प्रभाकर पाडाळे (वय 35, रा. महाळुंगे-पाडाळे, ता. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ससाणे बुधवारी सायंकाळी पाच वाजता आठवडे बाजारात भाजी आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे त्यांच्या तोंडओळखीचा आरोपी मुनीराज याने ‘बाबा मला वाटले तुम्ही गेले वर’ असे म्हटले.

त्यावर ‘तू असा का बोलतो’ अशी फिर्यादी यांनी विचारणा केली असता आरोपीने फिर्यादी यांच्या हातातील आधाराची काठी घेऊन त्यांना डाव्या खांद्यावर व पाठीत बेदम मारहाण करून जखमी केले.

हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.