Hinjawadi crime News : लेबर कॉन्ट्रॅक्टरचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला; बंद घरातून दुर्गंधी आल्याने प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज – लेबर कॉन्ट्रॅक्टरचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. हा प्रकार आज (शुक्रवारी, दि. 27) उघडकीस आला आहे. बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

गणपत सदाशिव सांगळे (वय 25, रा. कळंब, इंदापूर) असे मृतदेह सापडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास पिंपरी चिंचवड नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, हिंजवडी परिसरात एका बंद खोलीतून दुर्गंधी येत आहे.

नियंत्रण कक्षाकडून ही माहिती हिंजवडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता गणपत सांगळे यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला. हा प्रकार घातपाताचा असून गणपत याची हत्या झाल्याचा अंदाज प्रथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. गणपत लेबर कॉन्ट्रॅक्टर असून तो जांबे येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.