Pune News : त्या’ 100 देशांच्या राजदूतांचा 4 डिसेंबरचा दौरा रद्द !

एमपीसी न्यूज : जगभरात मृत्यूचं थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणुवर प्रभावीपणे मात करणारी कोविशिल्ड लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून तयार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर 4 डिसेंबर रोजी तब्बल 100 देशांचे राजदूत देखील कंपनीला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार होते. मात्र काही कारणास्तव हा दौरा रद्द झाला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पुण्यातील मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये कोविशिल्ड लसीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उद्या पंतप्रधान मोदी हे दुपारी 1 ते 2 या वेळेत येणार आहेत. त्यावेळी सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी मोदी संवाद साधणार आहेत.

त्यानंतर 4 डिसेंबर रोजी 100 देशांचे राजदूत देखील या ठिकाणी येऊन कोविड लस बाबत सध्य परिस्थितीचा आढावा घेणार होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र, हा नियोजित दौरा काही कारणास्तव रद्द झाल्याची माहिती राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.