Hinjawadi : तलवारीने केक कापल्याबद्दल शिवसेना पदाधिका-यावर गुन्हा

एमपीसी न्यूज -तलवारीने केक कापल्याबद्दल शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख तथा मुळशी तालुक्याचे माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (दि. 28) हिंजवडी पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.26) बाळासाहेब चांदेरे यांचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या राहत्या घराजवळ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्ते आणि उपस्थितांसमोर चांदेरे यांनी तलवारीने केक कापला.

तलवारीने केक कापल्याचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागल्याने त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.