Indori : भंडारा डोंगरावर गळफास घेऊन एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – भंडारा डोंगर येथे इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 28) सायंकाळी उघडकीस आली.

बाळकृष्ण बबन शिरसाठ (वय अंदाजे 40, रा. देहूगाव) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास माहिती मिळाली की, भंडारा डोंगराजवळ असलेल्या जंगलात एका झाडाला इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यानुसार तळेगाव एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत बाळकृष्ण यांच्या वडिलांचे मागील काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. तसेच घरात आर्थिक अडचणींवरून त्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचा अधिक तपस पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.