Hinjawadi News : कासारसाई येथे पार्क केलेल्या कारला अज्ञातांकडून आग, 3.50 लाखाचे नुकसान

एमपीसी न्यूज – कोळीवाडी कासारसाई येथे पार्क केलेल्या कारला अज्ञातांकडून आग लावण्यात आली. यामध्ये कारचे 3.50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि.24) दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला.

निखिल अनिल कांबळे (वय 23, रा. कासारसाई, मुळशी) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची चारचाकी MH 12 KY 5807 कोळीवाडी कासारसाई येथे लॉक करून पार्क केली होती. अज्ञात इसमाने कारला आग लावली. यामध्ये कारचे पुढील दोन्ही टायर, कुशन, काचा, इंजिनचा काही भाग जळून खाक झाला आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.