Hinjawadi : हिंजवडीत ऑनलाईन बेटींग ; आठ जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत माण (Hinjawadi)रोडवर एका हॉटेलमध्ये भाड्याने खोली घेऊन एका टोळक्याने ऑनलाईन बेटींग घेतली.

हा प्रकार सुरू असताना हिंजवडी पोलिसांनी कारवाई करत आठ जणांवर गुन्हा नोंदवला. ही कारवाई शुक्रवारी (दि. 19) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास हॉटेल कॅपिटल डीलक्स लॉज येथे करण्यात आली.

रावसाहेब गजानन बनसोडे (वय 25, रा. म्हाळुंगे, मुळशी), (Hinjawadi)यश गंगाराम नाईकनवरे (वय 21, रा. पिंपळे गुरव), प्रज्योत प्रकाश कुचेकर (वय 24, रा. म्हाळुंगे, मुळशी), शुभम गणेश मोरे (वय 23, रा. पिंपळे गुरव), आशिष अशोक घटमल (वय 28, रा. बेबडओहळ), आकाश संजय अडागळे (वय 24, रा. पिंपळे गुरव), तनिष गोयल (रा. पिंपरी), दिपाली गोयल (रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Talegaon : पोलीस असल्याची बतावणी करून महिलेच्या सोन्याच्या बांगड्या पळवल्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी माण रोडवरील हॉटेल कॅपिटल डीलक्स लॉज मध्ये भाड्याने खोली घेतली. त्यामध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपींनी ऑनलाइन माध्यमातून बेटिंग घेतली.

 

हा प्रकार हॉटेलमध्ये सुरू असल्याचे पोलिसांना समजले असता पोलिसांनी छापा मारून कारवाई करत पाच लाख 21 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.