Talegaon : पोलीस असल्याची बतावणी करून महिलेच्या सोन्याच्या बांगड्या पळवल्या

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करून (Talegaon)एका महिलेच्या सोन्याच्या दोन बांगड्या सुरक्षित ठेवतो असे सांगत हातचलाखी करून चोरून नेल्या. ही घटना दोन जानेवारी रोजी खांडगे पेट्रोल पंपाजवळ तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी महिलेने 20 जानेवारी रोजी तळेगाव दाभाडे पोलीस(Talegaon) ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : राज्यस्तरीय रोड सायकलिंग स्पर्धेत एस. बी. पाटील महाविद्यालयाचा रजन महाजन अव्वल 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला दोन जानेवारी रोजी खांडगे पेट्रोल पंपाजवळ असलेल्या महादेव मंदिरात गेल्या होत्या. तिथे एक अनोळखी व्यक्ती आला. त्याने तो पोलीस असल्याचे फिर्यादीस सांगितले.

 

तसेच फिर्यादीकडील 82 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या व्यवस्थित ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखीने दोन्ही बांगड्या घेऊन आरोपी प्रसार झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.