Hinjawadi : प्रवाशांना खाली उतरवून रिक्षा चालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – रिक्षातून प्रवाशांना घेऊन जात असताना एकाने रिक्षा अडवली. रिक्षातील प्रवाशांना खाली उतरवले आणि रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 12) दुपारी साडेचारच्या सुमारास कोयते वस्ती चौकात घडली.

गोपीनाथ धोंडिबा आढाव (वय 45, रा. पुनावळे) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रोहिदास गोपीनाथ पारखी रा. पुनावळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपीनाथ रिक्षा चालविण्याचे काम करतात. रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ते हिंजवडी मधील कोयते वस्ती चौकातून प्रवाशांना घेऊन जात होते. त्यावेळी रोहिदास या नेत्यांचे रिक्षा अडवली. रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांना त्याने खाली उतरवले. इथे धंदा करायचा नाही, असे म्हणत रोहिदास याने गोपीनाथ यांना लोखंडी पाईपने मारहाण केली. यामध्ये गोपीनाथ गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.