Hinjawadi : हिंजवडीत घरफोडीच्या दोन घटना; एक लाख 36 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरात घरफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये एकूण एक लाख 36 हजार 761 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत सोमवारी (दि. 24) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत प्रवीण लहू कुचेकर (वय 27, रा. माळवाडी, पुनावळे, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चार चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुचेकर हे छत्रपती सभांजी चौक भुमकर नगर वाकड मनोर बिल्डींग साईटवर साईट मॅनेजर म्हणून नोकरी करतात. त्यांनी एका खोलीत ठेवलेले 89 हजार 761 रुपये किमतीचे इलेक्ट्रिक साहित्य चार अनोळखी चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार 7 फेब्रुवारी रात्री सात ते 8 फेब्रुवारी सकाळी साडेनऊ या कालावधीत घडला आहे.

दुस-या घटनेत मयुरी दिगंबर वायाळ (वय 23, रा. लक्ष्मी चौक, फेज एक, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वायाळ यांची रूम 21 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रूममधून तीन लॅपटॉप, पॉवर बँक असे 47 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.