Hinjawadi : लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; अश्लील व्हिडिओ काढून केले ब्लॅकमेल

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्या माध्यमातून तरूणीकडून सात लाख रुपये घेतले. ही घटना हिंजवडी येथे सप्टेंबर 2017 ते 11 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार साईनाथ शेट्टी (वय 44, रा. ग्रीन्स, थेरगाव. मूळ रा. मयूर टॉवर, मरोळ, अंधेरी इस्ट, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेट्टी याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिचा अश्लील व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर टाकण्याची धमकी देत वेळोवळी तिला ब्लॅकमेल करीत तिच्याकडून सहा ते सात लाख रुपयांच्या महागड्या वस्तू घेतल्या. त्यानंतर तिला शिवीगाळ करीत मारहाणही केली. कुटुंबास जिवे मारण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कविता रूपनर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.