Pune : ‘सखी-एक थांबा केंद्रा’तून सुटणार अत्याचारग्रस्त महिला व बालिकांच्या समस्या

एमपीसी न्यूज – कौटुंबिक छळ, बलात्कार, लैंगिक छळ, देहविक्री, अॅसिड हल्ला, बालविवाह, सायबर गुन्हा, अपहरण व इतर प्रकरणांमधील अत्याचारग्रस्त (Pune) महिला व बालिकांनी आवश्यक ती मदत व मार्गदर्शन मिळविण्याकरीता सखी-एक थांबा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अश्विनी कांबळे यांनी केले.

सखी एक थांबा केंद्रामार्फत एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीत विविध प्रकारची मदत अत्याचारपिडीत महिला व बालिकांना देण्यात आली आहे. यामध्ये 225 महिला व बालिकांना विधी सेवा प्राधिकरणाचे विधी सहाय्य व सल्ला, 70 जणींना वैद्यकीय उपचारासाठी मदत व मार्गदर्शन, पोलीस कारवाईसाठी मदत व मार्गदर्शन 87 जणींना, 446 जणींना मानसिक समुपदेशन, 152 महिला व 18 बालिकांना सखी – एक थांबा केंद्र येथे (Pune) तात्पुरता आश्रय पुरविला असून 83 महिला व बालिकांना इतर सेवा पुरविण्यात आलेल्या आहेत.

Alandi : जय गणेश मंदिरात चंदन उटीद्वारे साकारण्यात आले श्री खंडरायाचे रूप

सखी-एक थांबा केंद्र क्र. 1, स्टेट बँक ऑफ इंडिया समोर, मुंढवा येथील शासकीय मुलींचे निरीक्षणगृह, विशेषगृह, बालगृह (संपर्क क्रमांक 8177955181) येथे स्थापन करण्यात आले आहे. अत्याचारग्रस्त महिला व बालिकांनी मदतीसाठी सखी-एक थांबा केंद्राशी संपर्क साधावा, असेही कांबळे म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.