Crime News : 14 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आला प्रकार

एमपीसी न्यूज : लग्न करण्याचे अमिष दाखवून एका 14 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार करण्यात आला. या सर्व प्रकारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 
वारजे माळवाडी पोलिसांनी याप्रकरणी सौरभ राजेंद्र मोरे (वय २३, रा. अहिरेगाव) याला अटक केली आहे. याबाबत १४ वर्षीय पिडीत मुलीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ मुलीला ओळखत होता. ओळखीचा फायदा घेऊन तो मुलगी घरी एकटी असताना तिच्या घरात शिरला. त्याने मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे सांगत तिची इच्छा नसताना जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर देखील त्याने इतर ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. मुलगी त्याच्यापासून १८ आठवड्यांची गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.