Cleanliness rally : पुणे रेल्वे विभागातील स्वच्छता मोहिमेदरम्यान स्वच्छता रॅली

एमपीसी न्यूज : पुणे विभागात सध्या स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. त्याअंतर्गत स्थानक, गाड्या, रेल्वे परिसर, कार्यालये, देखभाल डेपो येथे दररोज अनेक स्वच्छता उपक्रम राबविले जात आहेत. (Cleanliness rally) याच अनुषंगाने मंगळवारी वैद्यकीय विभागातर्फे स्वच्छता जनजागृती रॅली काढण्यात आली.

ताडीवाला रोड रेल्वे कॉलनी येथील कम्युनिटी सेंटर येथील सर्व स्वच्छता कर्मचारी व आरोग्य निरीक्षकांना मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. कणक राय यांनी संबंधित केले. यावेळी अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. ए.के.मिश्रा, आरोग्य अधिकारी डी.पी.गायकवाड, सहायक विभागीय यांत्रिकी अधिकारी गौरव राज व इतर वरिष्ठ आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

या प्रसंगी गृह व कामाच्या परिसराची स्वच्छता व आरोग्यदायी वातावरण राखण्यासाठी आणि सर्व लोकांच्या सहकार्याला चालना देण्यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना करण्यावर विशेष भर देण्यात आला.(Cleanliness rally) यासोबतच दैनंदिन कामात प्लास्टिकची गरज मर्यादित ठेवण्याचा संदेश देण्यात आला.

Transgender ID registration : तृतीयपंथीयांसाठी ओळखपत्राचे वाटप व नोंदणी अभियान

लोकांमध्ये स्वच्छता आणि आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी ताडीवाला रोड कम्युनिटी सेंटर येथून स्वच्छता कर्मचाऱ्यांची रॅली काढण्यात आली.(Cleanliness rally) ती ताडीवाला रोड कॉलनी, स्टेशन परिसर मार्गे मंडल रेल हॉस्पिटलमध्ये आली.  स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी रेल्वे रुग्णालयात स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून पथनाट्यही सादर करण्यात आले. ताडीवाला रोड येथील कम्युनिटी सेंटर येथेही यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.

पुणे विभागाच्या मिरज रेल्वे कॉलनी आणि स्थानकावर स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांकडून जनजागृती मोहीमही राबविण्यात आली.स्वच्छता कर्मचारी आणि वैद्यकीय विभागाच्या या प्रयत्नाचे सर्वांनीच कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन विभागीय मुख्य आरोग्य निरीक्षक नितीन शिंदे यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.