Hinjawadi : कर्ज काढून शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याचे आमिष दाखवत महिलेची वीस लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज – कर्ज काढून ते शेअर मार्केटमध्ये गुंतवून त्यामधून (Hinjawadi)  येणाऱ्या फायद्यातून नफा मिळवण्याचे आमिष दाखवत एका महिलेची तब्बल 20 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना एप्रिल 2023 ते 15 सप्टेंबर या कालावधीत मारुंजी येथे घडली आहे.

याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.14)महिलेने फिर्यादी असून अखिलेश गुर्जर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व आरोपी यांची (Hinjawadi) शादी डॉट कॉम ॲप द्वारे ओळख झाली. सुरुवातीला फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून आपण लग्न करून नवीन घर खरेदी करू असे स्वप्न दाखवले.

त्यासाठी आपल्याला कर्ज काढावे लागेल ते कर्ज काढून शेअर मार्केटमध्ये गुंतवावे लागेल. त्यातून येणाऱ्या फायद्यातून आपण कर्ज फेडून स्वप्न पूर्ण करू असे महिलेला आमिष दाखवण्यात आले.

त्यासाठी सध्या चालू असलेल्या कर्जाचे हप्ते संपवण्यासाठी म्हणून महिलेकडून वेळोवेळी 20 लाख 80 हजार रुपये घेतले. आत्तापर्यंत महिलेशी लग्न न करत तिची फसवणूक केली आहे.

हिंजवडी पोलिसांनी आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Chinchwad : सोन्याचे दागिने स्वच्छ करून देतो म्हणत दीड लाखांचे दागिने केले लंपास

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.