Hinjawadi : सराईत मोबाईल चोरट्यास हिंजवडी पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज – सराईत मोबाईल चोरट्यास हिंजवडी पोलिसांनी (Hinjawadi) अटक केली. त्याच्याकडून 12 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. रियाज शाहादुल्ला शेख (वय 21, रा. पाषाण सुतारवाडी पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Bhosari : भाजी खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीचा मोबाईल पळवला

पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक यादव यांनी 9 फेब्रुवारी रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली. यादव हे एका सोसायटीच्या गेटवर सुरक्षारक्षक म्हणून ड्युटी करीत असताना त्यांनी त्यांचा मोबाईल फोन चार्जिंगला लावला होता. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांचा मोबाईल फोन उचलून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना माहिती मिळाली की, माणगाव परिसरात एक व्यक्ती जुने मोबाईल फोन विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून (Hinjawadi) दोन लाख 28 हजार रुपये किमतीचे एकूण 12 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त बापु बांगर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, तपास पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापुसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरूण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, मंगेश सराटे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.