Pimpri : थरमॅक्स कंपनी सीनियर मॅनेजमेंट क्रिकेट स्पर्धा 2024 स्पर्धेत हिटिंग वॉरियर्स संघ विजयी

एमपीसी न्यूज – थरमॅक्स कंपनी सिनिअर मॅनेजमेंट दोन दिवसीय क्रिकेट (Pimpri) स्पर्धेत सहभागी 6 संघावर मात करत हिटिंग वॉरियर्स संघाने विजेतेपद पटकावले. 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी चाललेल्या या स्पर्धेत एकूण 6 संघांनी सहभाग घेतला. हिटींग वॉरियर्स,एनव्हायरो अँड आरटीआयसी,पॉवर वॉरियर्स,टीबीडब्ल्यूईएस फाल्कन्स,डब्ल्यूडब्ल्यूएस व क्रॉस फंक्शनल टायगर्स या संघांनी भाग घेतला.

Bhosari : भाजी खरेदीसाठी गेलेल्या व्यक्तीचा मोबाईल पळवला

स्पर्धेच्या प्रारंभी प्रास्ताविक गिरीश गायकवाड यांनी केले.पारितोषक वितरण प्रसंगी मीनल राव (एचआर हेड, आयपी) म्हणाल्या की खेळाडूंमध्ये उत्साह आणि मोटिवेशन मला दिसून आला. उत्साह आणि प्रयत्न जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस ध्येय सहज गाठले जाते. याप्रसंगी सुशील मालुसरे, शितल रावोटे, हरी देशपांडे, विशाल मेहरा, मीनल राव, संजय गोएल, आनंद देशमाने, रियाज उतावळे, गिरीश गायकवाड, स्टेला फ्रान्सिस, आनंद देशमाने, विशाल मेहरा, अजय हंतोडकर, असद हुसेन हे उपस्थित होते.

या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन गिरीश गायकवाड, स्टेला फ्रान्सिस, शितल रावोटे, सुशील मालुसरे, अमितसिंग, चैतन्य ढोकळे, विशाल गवळी यांनी केले. आभार प्रदर्शन हरी देशपांडे यांनी केले.

स्पर्धेच्या अंतिम फेरीचा1) “मॅन ऑफ द मॅच” मोहम्मद जावेद (हिटींग वॉरियर्स 2) “बेस्ट बॅट्समन” हर्ष शर्मा (पावर वॉरियर्स)3) “बेस्ट बॉलर” अमोल सिंग चव्हाण (हिटींग वॉरियर्स) 4) “मॅन ऑफ द सिरीज” हरीश भंजन (हिटींग वॉरियर्स) पारितोषक (Pimpri) यांना मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.