Hinjawadi : उस वाहून नेणा-या ट्रॅक्टरच्या धडकेत महिलेचा मृत्यू; दोघे जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. तर महिलेचा पती आणि त्यांची लहान चिमुकली जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री साडेदहाच्या सुमारास भूमकर चौक ते लक्ष्मी चौक दरम्यान घडली.

विमला राठोड असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. रमेश लुंबाजी राठोड (वय 36, रा. आल्हाट कॉलेज जवळ, मारुंजी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिया राठोड ही या अपघातात जखमी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश, त्यांची पत्नी आणि लहान मुलगी जिया हे तिघेजण दुचाकीवरून (एम एच 12 / जे जे 8042) जात होते. ते भूमकर चौक ते लक्ष्मी चौक दरम्यान हॉटेल समोर आले असता भरधाव वेगात आलेल्या ऊस वाहून नेणा-या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात रमेश यांची पत्नी विमला गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तसेच रमेश आणि त्यांची लहान मुलगी जिया हे दोघे देखील जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नकुल न्यामणे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.