Hinjawadi : चोरी करताना तिघांना अटक

एमपीसी न्यूज – चोरी करताना तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना (Hinjawadi)सोमवारी (दि. 16) मध्यरात्री हिंजवडी येथे घडली.

श्‍याम वसंत देवरे (वय 36, रा. चिखली), भूपेंद्र संजय चित्ते (वय 22, रा. मोशी) आणि अक्षय सुदाम पवार (वय 22, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. संजय चंद्रभूषण पाठक (वय 44 रा. दिघी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : रेल्वेच्या पुणे मंडळाने विकले 18 कोटींचे भंगार

सोमवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास आरोपी हिंजवडी येथील(Hinjawadi) टेक महिंद्रा कंपनीच्या मागे असलेल्या इंटस टॉवरमधील साहित्य चोरून नेताना मिळून आले. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.