Hinjwadi: वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या टपऱ्यांवर ‘एमआयडीसी’चा हातोडा

हिंजवडीतील शिवाजी चौकात सकाळपासून जोरात कारवाई

एमपीसी न्यूज – वाहतुकीला अडथळा ठरणा-या हिंजवडीतील रस्त्यांवरील टप-यांवर एमआयडीसीने हातोडा चालविला आहे. आज (शनिवारी) सकाळी साडेआठ वाजल्यापासून रस्त्यावरील टप-यांवर कारवाई करत रस्ता मोकळा केला जात आहे.

हिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. वाहतूक कोंडीवर पर्याय काढण्यासाठी विविध प्रयोग केले जात असून त्यासाठी पोलिसांनी एकेरी वाहतूक देखील सुरु केली आहे. रस्त्यावरील टप-यांमुळे देखील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

हिंजवडी, शिवाजी चौकातील रस्त्यावरील टप-यांवर एमआयडीसीने सकाळपासून कारवाईला जोरदार सुरुवात केली आहे. रस्त्यांवरील टप-यांवर हातोडा चालविला जात आहे. जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली जात असून कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हिंजवडी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.