Homemade steamer : करोनाची भीती कशाला धरा, घरच्या घरी घ्या वाफारा

Why be afraid of corona, use steam at home

एमपीसी न्यूज – सध्या प्रत्येकजण करोनाच्या भीतीने ग्रस्त आहे. दररोजची कामे तर करायला लागतातच. त्यासाठी घराबाहेर पडावेच लागते. मास्क नित्यनियमाने वापरला जातो. तसेच सोशल डिस्टन्सिंगपण राखले जाते. प्रत्येक ठिकाणी इमानेइतबारे सॅनिटायझर वापरला जातो. घराबाहेर पडताना सॅनिटायझरची बाटली सोबत ठेवली जाते. थोडासा जरी कोणाशी संपर्क आला तरी लगेच आवश्यक ते सर्व उपाय योजले जातात.

मात्र तरीदेखील प्रत्येकाच्या मनात तो करोनाचा विषाणू आपल्यावर कधी हल्ला करेल याची भीती असतेच. बाहेरुन भाजीपाला आणला की त्याचे निर्जंतुकीकरण कसे करायचे याचे अनेक मार्ग आजपर्यंत वापरले गेले. पण यासाठी एक अत्यंत साधा आणि घरगुती उपाय दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कुकरच्या माध्यमातून कशा प्रकारे वाफ तयार करुन भाज्या, फळे शुद्ध करता येतील हे सांगितले आहे.

आपल्या साध्या प्रेशर कुकरची शिट्टी काढून ठेवायची. त्या जागी एक मजबूत प्लास्टिकची नळी लावायची. पुरेसे पाणी कुकरमध्ये भरायचे आणि  तयार होणारी वाफ या नळीच्या माध्यमातून बाजारातून आणलेल्या भाजीपाल्यावर, फळांवर सोडायची की त्यांचे निर्जंतुकीकरण सोप्या पद्धतीने करता येते. आपल्याला जेवढा वेळ हवे तेवढी वाफ या भाजीवर सोडायची की त्यांच्यातील जंतू सहजगत्या नष्ट होतील.

सध्या पावसाळी दिवस आहेत. थोडेसे जरी भिजायला झाले तरी काळजी न करता अशाच प्रकारे वाफ घेतली तर नाक, घसा मोकळा ठेवणे शक्य आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिकल स्टोअर्समध्ये स्टीमर किंवा व्हेपरायझरला जास्त मागणी आहे. आणि मागणी जास्त असल्याने ते सध्या एक तर उपलब्ध तरी नाहीत अन्यथा अव्वाच्या सव्वा किंमतीत विकले जात आहेत. अशा परिस्थितीत हा घरच्या घरी करता येणारा उपाय खूपच उपयुक्त आहे.

View this post on Instagram

बाहेरुन भाजीपाला आणला की त्याचे निर्जंतुकीकरण कसे करायचे याचे अनेक मार्ग आजपर्यंत वापरले गेले. पण यासाठी एक अत्यंत साधा आणि घरगुती उपाय दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत कुकरच्या माध्यमातून कशा प्रकारे वाफ तयार करुन भाज्या, फळे शुद्ध करता येतील हे सांगितले आहे. . #mpcnews #i_support_mpcnews #marathinews #homemadesteamar #cleanvegetables #vegitablesenetizer #senetizer #coronavirus #staysafe

A post shared by MPC News Pvt. Ltd. (@mpcnews.in) on

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.