Talegaon Dabhade: रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे सामाजिक कार्य कौतुकास्पद- रो.मंगेश हांडे

Talegaon Dabhade: Social work of Rotary Club of Talegaon MIDC is commendable- Ro.Mangesh Hande रोटरीचे हे पर्यावरण वर्ष राहणार असून सर्व प्रकल्प हे पर्यावरण शिक्षण आरोग्य पुरक करण्यात येतील असे सांगितले.

एमपीसी न्यूज- रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे, असे वक्तव्य रोटरी डिस्ट्रीक्ट 3131चे फाऊंडेशन डायरेक्टर रो. मंगेश हांडे यांनी केले. ते रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या पदग्रहण समारंभप्रसंगी बोलत होते.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचा 12 वा पदग्रहण समारंभ स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमधील मावळ भूषण मामासाहेब खांडगे सभागृहामध्ये नुकताच पार पडला.

यावेळी रोटरी वर्षे 2020-21च्या रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या नूतन अध्यक्षपदाची सूत्रे रो. रजनीगंधा खांडगे यांनी मावळते अध्यक्ष रो. गणेश काकडे यांच्याकडून स्वीकारली व नूतन सचिवपदाची सूत्रे रो.सचिन कोळवणकर यांनी मावळते सचिव रो. दशरथ जांभूळकर यांच्याकडून स्वीकारली.

यावेळी रोटेल बुलेटिनचे प्रकाशन प्रमुख पाहुणे रो. मंगेश हांडे यांच्या हस्ते करण्यात आले. वर्षे 2020-2021चा रोटरी व्होकेशनल एक्सलन्ट अवार्ड ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दिपक बिचे यांना सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व रोपे देऊन गौरविण्यात आले.

रो. रजनीगंधा खांडगे यांनी रोटरीचे हे पर्यावरण वर्ष राहणार असून सर्व प्रकल्प हे पर्यावरण शिक्षण आरोग्य पुरक करण्यात येतील असे सांगितले.

रोटरी क्लब सदस्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून झालेल्या पदग्रहण समारंभाचे आभार प्रदर्शन उपाध्यक्षा रो. सुमती निलवे यांनी केले. सूत्रसंचालन रो. सविता नाणेकर व रो. अनिल धर्माधिकारी यांनी केले. प्रकल्प प्रमूख म्हणून रो. मिलिंद शेलार यांनी काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.