Regional Training: घरगुती वापर खर्च सर्वेक्षणाचे प्रादेशिक प्रशिक्षण उत्साहात

एमपीसी न्यूज : भारत सरकारच्या, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाअंतर्गत होणा-या सर्वेक्षणासाठी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO (फील्ड ऑपरेशन्स डिव्हिजन) च्या प्रादेशिक कार्यालय पुणे तर्फे घेण्यात आलेले तीन दिवसीय प्रादेशिक प्रशिक्षण उत्साहात पार पडले. (Regional Training) त्याला प्रशिक्षणार्थींचा मोठा प्रतिसाद मिळाला.

 

सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी  27, 28 आणि 29 जुलै, 2022 दरम्यान राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO (फील्ड ऑपरेशन्स डिव्हिजन) च्या प्रादेशिक कार्यालय पुणे तर्फे प्रादेशिक प्रशिक्षण शिबिर पार पडले. आकुर्डीत झालेल्या तीन दिवसीय प्रादेशिक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या डेटा क्वालिटी अॅश्युरन्स विभागाचे (नागपूर) उपमहासंचालक जुनैद फास्की यांच्या हस्ते करण्यात आले. (Regional Training) अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालयाचे सहसंचालक हनुमंत माळी, पुण्यातील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक श्रीनिवास विजय शिर्के, उपसंचालक, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय हे व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी प्रशिक्षनार्थीचे व इतर सहभागींचे स्वागत केले आणि सर्वेक्षणाची उद्दिष्टे स्पष्ट केली.

 

Loni kalbhor : सुनेची आठ वर्षांपूर्वी आत्महत्या; आता पोलीस असणाऱ्या सासऱ्याने उचलले तेच पाऊल

भारत सरकारच्या, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय अंतर्गत (MoSPI) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO), 1 ऑगस्ट 2022 पासून संपूर्ण भारतात घरगुती अभोग खर्च सर्वेक्षण (HCES) 2022-23 सुरु करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणचा कालावधी एक वर्षाचा असेल. सर्वेक्षणात संकलित केलेली माहिती प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भारतातील ग्राहक किंमत निर्देशांकांच्या संकलनासाठी एकूण उपभोगातील विविध कमोडिटी गटांच्या बजेट शेअर्सच्या निर्धारणाद्वारे वेटिंग डायग्राम तयार करण्यासाठी वापरली जाईल. याशिवाय जीवनमान, सामाजिक उपभोग आणि कल्याण आणि त्यातील असमानता यांचे सांख्यिकीय निर्देशक सर्वेक्षणात गोळा केलेल्या डेटामधून संकलित केले जातील. कौटुंबिक उपभोग खर्च सर्वेक्षणाचा सर्वेक्षण कालावधी 10 पॅनेलमध्ये विभागला जाईल. प्रत्येक पॅनेल तीन महिन्यचा असेल. क्षेत्रीय सर्वेक्षण करताना सखोल चौकशीच्या गरजेवर त्यांनी भर दिला आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षणादरम्यान झालेल्या चर्चेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.

 

जुनैद फारूकी यांनी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे देशाच्या विकासातील महत्व विशद केले. तसेच कौटुंबिक उपभोग खर्च सर्वेक्षणातील संकल्पना थोडक्यात समजावुन सांगितल्या. (Regional Training) ‘कौटुंबिक उपभोग खर्च सर्वेक्षणाद्वारे राष्ट्रीय लेखा विभागासाठी अत्यंत महत्वाचा घटक असलेल्या दरडोई खर्चाचे मोजदान केले जाईल’. हनुमंत माळी यांनी सर्वेक्षण करताना येणा-या अडचणी व त्यावर कशी मात करता येईल हे विस्तृतपणे सांगितले.

 

नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस (NSO), फील्ड ऑपरेशन्स डिव्हिजन (FOD) द्वारे हे सर्वेक्षण ग्रामीण भागांमध्ये आणि शहरी ब्लॉक्समध्ये केले जात आहे. जे सांख्यिकीय नमुने घेण्याच्या तंत्राचा वापर करून निवडले जातात. निवडलेल्या ग्रामीण भागामधून आणि शहरी गटांमधून  18 कुटुंबांची निवड केली जाईल. या कुटुंबांची माहिती 3 महिन्यात एकाच घराला 3 भेटी देऊन संकलित केली जाईल. या 3 भेटींमध्ये टॅब्लेट वापरून घरगुती वैशिष्ट्ये, खाद्यपदार्थ, उपभोग्य सेवा आणि टिकाऊ वस्तूंवरील घरगुती खर्चाची माहिती संकलित केली जाईल.

 

या सर्वेक्षणात वापरल्या जाणा-या तांत्रिक संकल्पनांवर चर्चा आणि विचारमंथन करण्यासाठी सुमारे 70 क्षेत्रीय अधिकारी प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहेत. (Regional Training) श्रीनिवास विजय शिर्के, महेश चोरघडे, सूरजकुमार गुप्ता हे वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी प्रशिक्षण देतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी गरीमा सिंग यांनी केले. वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी महादेव कुलाळ, आनंदसागर रोटे, ऐश्वर्य श्रीवास्तव यांनी संयोजनात पुढाकार घेतला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.