Loni kalbhor : सुनेची आठ वर्षांपूर्वी आत्महत्या; आता पोलीस असणाऱ्या सासऱ्याने उचलले तेच पाऊल

एमपीसी न्यूज : पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशन (Loni kalbhor) परिसरात राहणाऱ्या आणि पोलीस दलात कार्यरत असलेल्या सुनील नारायण शिंदे (वय 50) यांनी बुधवारी मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुनील शिंदे हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मयत सुनील शिंदे यांच्या सुनेने देखील आठ वर्षांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर सासर्‍याने ही आठ वर्षांनी अगदी तेच पाऊल उचलले.

सुनील शिंदे हे कदमवाकवस्ती परिसरात राहत होते. बुधवारी रात्री ते नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी लवकर उठणारे सुनील शिंदे हे नेहमीप्रमाणे बाहेर न आल्याने मुलाने खोलीत जाऊन पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याची निदर्शनास आले. त्यांनी खोलीतील पंख्याला गळफास घेतला होता. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस ठाण्यात याची नोंद करून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान सुनील शिंदे यांच्या सुनील देखील आठ वर्षांपूर्वी गर्भास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांचा मुलगा आणि पत्नी विरोधात भादवी कलम 366 नुसार गुन्हा दाखल आहे. याबाबत बुधवारी न्यायालयात सुनावणी सुरू होती. यात मनासारखी सुनावणी न झाल्याच्या निराशातून त्यांनी आत्महत्या (Loni kalbhor)
केली असावी असा संशय आता व्यक्त केला जात आहे.
https://youtu.be/tWzR084iQww

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.