Rohit Tilak : काँग्रेस नेते रोहित टिळक भाजपच्या वाटेवर?

एमपीसी न्यूज : काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीचे माजी सदस्य रोहित टिळक (Rohit Tilak) हे आता भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. दरवर्षी टिळक स्मारक ट्रस्ट कडून लोकमान्य टिळक राष्ट्रीय सन्मान पुरस्कार दिला जातो.
या पुरस्कार सोहळ्याला दरवर्षी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित असतात. मात्र, यावर्षी या समारंभाचे प्रमुख पाहुणे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आहेत. त्यामुळे रोहित टिळक हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगले आहेत.

काही दिवसांपूर्वीच रोहित टिळक यांच्याकडून प्रदेश कार्यकारणी पदाचा राजीनामा घेण्यात आला आहे. गोव्यात झालेल्या काँग्रेसच्या संकल्प कार्यशाळेत पक्षाची एक व्यक्ती दहा वर्षापेक्षा जास्त काळ पदावर नको असा ठराव घेण्यात आला. त्यामुळे रोहित किंवा त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हाच रोहित टिळक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता टिळक कुटुंबीयांच्या घरच्या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष येणार असल्याने पुन्हा एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
रोहित टिळक (Rohit Tilak) यांनी यापूर्वी दोन वेळा कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र दोन्ही वेळेस त्यांचा पराभव झाला. रोहित टिळक हे विधान परिषदेचे दिवंगत माजी सभापती व काँग्रेस नेते जयंतराव टिळक यांचे नातू आहेत. आता त्यांचे वडील दीपक टिळक हे देखील काँग्रेसमध्येच आहे. स्वतः रोहित ही मागील आणि कोर्स पासून काँग्रेसचेच काम करत आहेत. मात्र आता टिळक कुटुंबीयांच्या घरच्या कार्यक्रमालाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष येणार असल्याने रोहित टिळक भाजपच्या वाटेवर आहेत की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.