Crime News : मौज-मजेसाठी मोबाईल व इलेक्ट्रीक वस्तू चोरणारे अटकेत; दहा लाखांचा जप्त

एमपीसी न्यूज – मौजमजेसाठी घरफोडी करीत घरातील महागडे मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरणारा चोरटा व त्याचा अल्पवयीन साथीदार यांना कोरेगाव पोलिसांनी अटक (Crime News) केली असून त्यांच्याजवळून पोलिसांनी तब्बल दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

गणेश तिमन्ना साखरे ( वय 21 रा.कोरोगाव पार्क) व एक विधी संघर्षीत बालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क येथील लिबर्टी सोसायटी येथील एका बंगल्यामध्ये 19 जुलै रोजी घरफोडी झाली होती. ज्यामध्ये चोरट्यांनी 2 एलईडी टीव्ही, 2 पॉवर स्पीकर, 2 सराऊंड स्पीकर, 1 एम्पली फायर व 1 बुम बॉक्स तसेच शेजारील बंगल्यातून 65 इंची एलईडी चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास चक्रे फिरवली. यावेळी पोलिसांनी बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून गणेश व त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी संशयावरून ताब्यात (Crime News) घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्हा कबुल केला.

 

Pune Mobile Theft: मोबाईल चोरी करणारे सराईत ताब्यात

 

यावेळी पोलिसांनी त्यांच्या जवळून चोरीला गेलेले सामान,  अॅपल कंपनीचे मोबाईल, अॅपल वॉच, लॅपटॉप  असा एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यावेळी गणेशवरील मुंढवा पोलीस ठाण्यातील चोरीचा गुन्हा (Crime News) उघडकील आला. कोरेगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.