Pune Mobile Theft: मोबाईल चोरी करणारे सराईत ताब्यात

एमपीसी न्यूज : पुण्यात दोन अल्पवयीन मुलांसह एका सराईताला पोलिसांनी बेड्या घातल्या असून त्यांच्याजवळून तब्बल दहा मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. (Pune Mobile Theft) ही कारवाई पुणे आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा पाच यांनी केली आहे.

 

ऋषीकेश संजय देडे (वय.21 रा.कुंजीरवाडी,मुळ अक्कलकोट) व त्याचे दोन अल्पवयीन साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक गुरुवारी हडपसर परिसरात गस्त गालत असताना त्यांना तीन जण चोरीचे मोबाईल विक्री करण्यास येणार असल्याची खबर मिळाली. (Pune Mobile Theft) पोलिसांनी त्यानुसार सापळा रचून देडे व त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून पोलिसांनी एक दुचाकी व 10 मोबाईल असा 2 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

 

Crime News : दागिने बघण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची बोरमाळ हिसकावली

यावेळी आरोपीवरील हडपसर पोलीस ठाण्यातील पाच, येरवडा पोलीस ठाण्यातील दोन, लोणीकाळभोर पोलीस ठाणे, यवत पोलीस ठाणे, दिघी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा दहा गुन्ह्यांची उकल करण्यात आली. आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.