HSC Exam Form : बारावी परीक्षेचे ऑंनलाईन फॉर्म भरण्यासाठी 18 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने 2021 मध्ये घेण्यात येणा-या बारावी परिक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 18 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. सरल डेटाबेस वरून 18 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना नियमित शुल्काने परीक्षा अर्ज सादर करता येणार आहे.

मंडळाच्या वतीने प्रसिद्धीपत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना 15 डिसेंबर 2020 ते 4 जानेवारी 2021 या कालावधीत सरल डेटाबेस वरून नियमित शुल्काने आवेदन सादर करता येणार होते. नियमित शुल्काने आवेदन भरण्यास मंडळाने 18 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

www.mahasscboard.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.