HSC Results : जैन ज्युनिअर कॉलेजचा बारावी विज्ञान शाखेचा 100% निकाल

100% result of 12th Science branch of Jain Junior College

एमपीसी न्यूज – पाचव्या वर्षी जैन काॅलेजने 100% यशाची परंपरा कायम राखली आहे. गौरव नितीन राठोड, प्रज्ञा संजीव अडसूळ, श्रीया संतोष दाभोळकर या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय  क्रमांक पटकावला.

HSC बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या 2019- 2020 या वर्षीच्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीही जैन ज्युनिअर कॉलेजने 100% निकालाची परंपरा कायम राखली

पाचव्या वर्षी देखील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन करून काॅलेजच्या शिरपेचात यशाचा तुरा खोवला त्यामुळे शाळेच्या प्राचार्या व शिक्षकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

या काॅलेजमधील गौरव राठोड याने 85.08% गुणांसह प्रथम येण्याचा बहुमान मिळवला, प्रज्ञा अडसूळ हीने 82.15 % गुण मिळवून द्वितीय, तर श्रीया दाभोळकर हिने 77.38% गुण मिळवून तृतीय क्रमांक  पटकावला आहे.

काॅलेजच्या व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी प्राचार्य व सर्वच शिक्षकांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कौतुक केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.