HSC Results : इंदोरी प्रगतीचा 12वी निकाल 86.20%

12th result of Indori Pragati Vidyamandir 86.20%

 एमपीसी न्यूज – इंदोरी येथील प्रगती विद्यामंदिर व हभप आ.ना.काशिद पा.कनिष्ठ महाविद्यालयातील  एच.एस.सी.(काॅमर्स) 29पैकी 25 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 86.20% लागला आहे.

याही वर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. पहिल्या तीन मध्ये सर्व मुलीच आहेत. तर 16 मुलींपैकी 15 मुली पास (93.75%) तर 13 मुलांपैकी 10 मुले पास होऊन 76.92% मुलांचा निकाल लागला आहे.

विद्यालयातील पहिले तीन क्रमांक 

प्रथम – कु.निकिता साबळे(80.30%)

द्वितीय – कु.दिव्या क्षीरसागर (73.38%)

तृतीय – कु.माधवी दिवसे(69.53%)

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था पदाधिकारी व विद्यालयाचे वतीने अभिनंदन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.