Crime News : पत्नीचा खून करून पती फरार

एमपीसी न्यूज – प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा खून करुन पती फरार (Crime News) झाला आहे. वाकड येथील भूजबळवस्तीत मंगळवारी (दि. 19) हा प्रकार घडला आहे.

 

आशिष भोसले (वय 23 रा. भूजबळवस्ती, वाकड) असे फरार पतीचे नाव असून त्याने पत्नी किर्ती आशिष भोसले (वय 19) हिचा मंगळवारी (दि.19) राहत्या घरी खून केला आहे. यावरून किर्तीच्या (Crime News) नातेवाईकांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Pune Crime News : चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच! निवृत्त अधिकाऱ्याचे घर फोडले, 67 तोळे दागिने लंपास

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोसले याचे त्याच्याच ऑफीसमधील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र त्याच्या या प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पत्नीला त्याने राहत्या घरी ओढणीच्या (Crime News) सहाय्याने गळा आवळून खून केला. त्याने कोणाला संशय येऊ नये म्हणून घराला बाहेरून कुलूप लावले होते. मात्र बुधवारी उशीरा हा प्रकार समोर आला. हिंजवडी पोलीस ठाण्यात भोसले विरोधात गुन्हा दाखल केला असून हिंजवडी पोलीस भोसलेचा शोध घेत आहेत. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.