Crime News : पत्नीशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – पत्नीशी प्रेम संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने एका इसमाला बेदम मारहाण करत त्याच्या गुप्तांगावर वॉलीनी स्प्रे फवारला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.21) सकाळी साडे अकराच्या सुमारास वाकड (Crime News) येथील छत्रपती चौकात घडला आहे.

 

 

अजय राजेंद्र पवार (रा.वारजे माळवाडी) व प्रमोद बाळू चासकर (रा. वारजे, माळवाडी) अशी आरोपींची नावे असून यातील प्रमोद याला पोलिसांनी अटक (Crime News) केली आहे. तर मनोहर उर्फ सोन्या वसंत वेताळ (वय 30 रा.चिखली) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pune News : पुणे न्यायालयाकडून डीएसकेंना मोफा प्रकरणात जामीन, काय आहे प्रकरण वाचा इथे

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवार याच्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून पवार याने प्रमोदच्या सहाय्याने फिर्यादीचे अपहरण कले व गाडीतच लाथाबुक्क्यांनी, बेल्ट, लोखंडी पाईप व बेल्टने मारहाण केली.जिवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या डोळ्यावर व गुप्तांगावर वॉलीनी स्प्रे Crime News मारला.यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.