Ajit Pawar Birthday : अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

संजीवन वन उद्यान डुक्कर खिंड वारजे येथे हा कार्यक्रम पुणे महापालिका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ यांनी आयोजित केला होता. यावेळी वड, लिंबू, पिंपळ, जांभूळ, साग झाडे लावण्यात आली. यावेळी खडकवसला मतदार संघाचे अध्यक्ष काका चव्हाण, नीलिमा डोळसकर, शांता नेवसे, सामाजिक कार्यकर्ते महेश ठाकूर, ज्ञानेश्वर हांडे, महादेव गायकवाड, नंदकिशोर बोधाई, शिवाजी भोईने, सुरेश जाधव, पांडुरंग पाटील, तरडेकाका, देशमुखकाका, समीर तिखे, विष्णू सरगकर, वन विभागाचे अधिकारी एस. के. बर्वे, उपसरपंच रघुनाथ ठाकर उपस्थित होते.

 

 

सुमारे 35 एकर जागेत संजीवन वन उद्यान साकारण्यात आले आहे. या ठिकाणी पुणे महापालिकेतर्फे कमान लावण्याचे काम सुरू असल्याचे बाबा धुमाळ यांनी सांगितले. सकाळी वारजे – माळवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने फिरायला येतात. हिरवीगार झाडे, सुंदर वातावरण पाहून निसर्गमय वातावरण जाणवत असल्याचे दीपाली धुमाळ म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.