Pune News : पुणे न्यायालयाकडून डीएसकेंना मोफा प्रकरणात जामीन, काय आहे प्रकरण वाचा इथे

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सध्या तुरुंगात आहेत. हजारो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप डीएसके यांच्यावर आहे. हा घोटाळा जेव्हा उघडकीस आला होता तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसला होता. कारण डीएसके हे चांगले आणि प्रथितयश नाव होते. मात्र हजारो (Pune News)  गुंतवणूकदारांची त्यांनी कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली होती. तुरुंगात असलेल्या डी एस कुलकर्णी यांना दिलासा देणारे एक बातमी समोर आली आहे. पुणे न्यायालयाने त्यांना मोफत प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. 

 

2016 साली दाखल झालेल्या एका प्रकरणात त्यांच्यावर मोफा अंतर्गत गुन्हा दाखल आहे. 2016 साली सिंहगड पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीने फ्लॅट खरेदीदारांकडून आगाऊ रक्कम घेतली. आणि त्यानंतर खरेदीदारांना जाणून-बुजून ताबा न दिल्याचा आरोप त्यांच्यावर (Pune News) ठेवण्यात आला होता. या गुन्ह्यात पुढे त्यांना मार्च 2019 आली अटक करण्यात आली. कुलकर्णी सध्या तुरुंगात आहेत. या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची धावपळ सुरू होती. कोर्टाने अखेर त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.