Maval News : मावळ तालुक्यातील कुसगाव जि.प.शाळेला ‘स्वच्छ विद्यालय’पुरस्कार

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) – स्वातंत्र्याच्या अमॄतमहोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या ‘स्वच्छ विद्यालय’ स्पर्थेत मावळ तालुक्यातील  कुसगावला जि.प.शाळेला  ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुणे जिल्हा (Maval News) परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचे हस्ते शाळेतील शिक्षक नितीन भोंगळे यांनी हा पुरस्कार स्विकारला. मावळमधील एकमेव जिल्हा परिषद शाळेलाहा पुरस्कार मिळाल्याने पंचक्रोशीतून शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

 

पुरस्कारासाठी शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता,शौचालयाची व्यवस्था,हात धुण्यासाठीची व्यवस्था,देखभाल व्यवस्था,वर्तणूक बदल व क्षमता विकास अशा5 क्षेत्रांमध्ये एकूण 39 घटक निश्चित करण्यात येतात त्यानुसार शाळांना प्राप्त होणारे गुण विचारात घेवून त्यांना श्रेणी देण्यात येते.शाळा व गावाचा अभिमान वाढवणारा हा पुरस्कार (Maval News) असल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन सदस्य,विद्यार्थी व शिक्षक यांनी शाळेत साजराकेला.प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी ज्ञानेश्वर गुंड,उपरपंच सुरज केदारी यांनी मुख्याध्यापिका मानकर मॅडम व शिक्षकांचा सत्कार केला.

 

Pune News : पुणे न्यायालयाकडून डीएसकेंना मोफा प्रकरणात जामीन, काय आहे प्रकरण वाचा इथे

 

या कार्यक्रमात उपसरपंच सुरज केदारी,ज्ञानेश्वर गुंड व शाळा व्यवस्थापन सदस्य किसन गुंड यांनी शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत सदस्या फरिन मजिद शेख,जालिंदर झगडे,मदन गाडे,ऋषिकेश ठुले हे पदाधिकारी उपस्थित होते. शिक्षक महादेव शेलार यांनी शाळेच्या उपक्रमांची माहिती दिली तर शाळेच्या शिक्षिका दैवशाला एकाळे व नितीन भोंगळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.