Pune News : पुण्यात आजी-माजी उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ, पोस्टर वॉर मधून भाजप राष्ट्रवादीचे एकमेकांना चिमटे

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा आज वाढदिवस. या दोघांनाही शुभेच्छा देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या चढाओढ सुरू असल्याचा दिसत आहे. आणि यातूनच सध्या पुण्यात पोस्टरवॉर रंगले आहे. या दोघांनाही शुभेच्छा देणारे बॅनर शहरात अनेक (Pune News) ठिकाणी लागले आहेत. मात्र पुण्यात लावण्यात आलेल्या अलका चौकातील बॅनर्जी वेगळी चर्चा सुरू आहे. अगदी समोरासमोर लावलेले हे बॅनर राजकीय क्षेत्रासह पुण्यातही चर्चेचा विषय ठरतात. 

अलका चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी एक भलं मोठं बॅनर लावले. आणि या बॅनरच्या माध्यमातून एक प्रकारे भाजपला दिवचण्यात आले. बैठका होतील, ताफा दिसेल.. पण अशी धडाडी तिथे नसेल.. एकच पालक अजित पवार असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आलाय.. राज्यात सत्ता बदल (Pune News) झाल्यानंतर पुण्याचा पालकमंत्री कोण होणार अशी चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे देखील नाव चर्चेत आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अचूक टायमिंग साधत भाजपला लक्ष केले आहे.

तर अलका चौकातच अजित पवारांच्या या बॅनरपासून काही अंतरावर लागलेल्या बॅनरमध्ये देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. निष्कलंक नेतृत्व निर्विवाद कर्तृत्व असे लिहीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुणेकरांच्या मूलभूत प्रश्नांना हात घातला होता. मेट्रोचा (Pune News) विषय असो वा शहरातील इतर अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला होता.

 

 

राज्यातील या दोन नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो हा योगायोग. परंतु या वाढदिवसालाच या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न अशा प्रकारे फ्लेक्सच्या (Pune News) माध्यमातून करण्यात आला आहे. आता या बॅनर बाजीवर या दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया काय येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.