Pune Traffic : वाहतूक नियमन करणारे पोलीस गेले कुठे? रस्त्यावर वाहन कोंडी पोलीस मात्र गायब

एमपीसी न्यूज – सध्या पुण्यात पावसाचं वातावरण आहे. रस्त्यावर खड्डे पडलेत पाणी साचले अशा परिस्थितीत वाहन चालकांना वाहन कोंडीला सामोर जावं लागतय. मात्र रस्त्यावर होणारी ही वाहतूक कोणी सोडवण्यासाठी पोलीस मात्र दिसत नाहीयेत. पावसामुळे म्हणा किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झालीच तर वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक कोंडी (Pune Traffic) सोडवण्याचं कर्तव्य केलं पाहिजे. परंतु वाहतूक नियमन करणारे पोलीस मात्र अशा ठिकाणी दिसून येत नाहीत. त्यामुळे हे पोलीस गायब तरी झाले कुठे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. 

 

Crime News : दोन आरोपींकडून अडीच लाखांचा गुटखा जप्त;पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा पाचची कारवाई

 

वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमन करण्याऐवजी रस्त्यावर वाहन चालकांना अडवून दंड वसूल केला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलिसांना दंडात्मक कारवाई करू नये असे आदेश दिले होते. वाहतूक पोलिसांकडून केली जाणारी टोइंगची कारवाई, रस्त्याच्याकडेला उभे राहून पावत्या फाडण्याचे प्रकार पुढील आदेश येईपर्यंत थांबवावेत, अशा सक्त सूचनाच पोलीस आयुक्तांनी (Pune Traffic) दिल्या होत्या. त्यानंतर 12 जूनपासून वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारची दंडात्मक कारवाई थांबवण्यात आली होती. तेव्हापासून मात्र रस्त्यावरील वाहतूक पोलीस गायब झालेले दिसतात.

 

 

पुणे शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यावर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. त्यात पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले. त्यामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यावर वाहन चालकांना वाहतूक कुणीचा (Pune Traffic) सामना करावा लागतो. याचा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागतोय. रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक पोलीस ही दिसत नसल्याने ही वाहतुकीची कोंडी कोण सोडवेल असा प्रश्न देखील सर्वसामान्य पडलाय. त्यामुळे वाहतूक पोलीस केवळ दंड वसुली करण्यासाठीच आहेत का असा प्रश्न देखील आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातोय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.