Shivajirao Adhalrao : ‘कुठूनही निवडणूक लढवा शिवसैनिक तुम्हाला…’, शिवसेना नेत्याचं आढळरावांना ओपन चॅलेंज

एमपीसी न्यूज – शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिलाय. पक्ष नेतृत्वावर त्यांनी टीका करताना आपण शिंदे गटात जात असल्याचा जाहीर केले. त्यानंतर आता शिरूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनिकांकडून आढळरावांना टार्गेट केले जाते. आढळराव पाटलांनी (Shivajirao Adhalrao) कुठूनही निवडणूक लढवावी शिवसैनिक त्यांना पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं शिवसेनेचे उपनेते रवींद्र मिरलेकर यांनी सांगितले. 

 

 

रवींद्र मिरलेकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेबरोबर गद्दारी करणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कुठूनही निवडणूक लढवावी, निष्ठावंत शिवसैनिक (Shivajirao Adhalrao) त्यांना पराभूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला. शिवसैनिकांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आजपासून कामाला लागावे असं आवाहन देखील त्यांनी केले. मंचर शहरात झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत ते बोलत होते.

 

Pimpri News : शहरात 1110 खड्डे; 846 खड्डे बुजविल्याचा पालिकेचा दावा

 

यावेळी बोलताना मिरलेकर म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिवसैनिक अजूनही जागेवरच आहे. फक्त आढळराव निघून गेले. आढळराव पाटील खासदार झाल्यापासून शिवसेनेला (Shivajirao Adhalrao) उतरती का लागली आहे. त्यांच्या काळात फक्त ऑर्डर ऑफ सेना वाढविण्याचे काम झाले आहे. 2004 साली ते शिवसेनेत आले. त्यानंतर ते तीन वेळेस खासदार झाले. या तीन टर्म च्या काळात त्यांनी फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये भांडणे लावण्याचे काम केले. त्यामुळे आगामी काळात शिवसैनिकांनी आढळराव पाटील यांना जागा दाखवावी असं आवाहनही रवींद्र मिरलेकर यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.