Pune: पुढील तीन दिवसात राज्यात हलक्या पावसाची शक्यता, तापमानातही घट होण्याची चिन्हे

एमपीसी न्यूज – पुढील तीन दिवसात राज्यात किनारपट्टीवगळता हलक्या (Pune)सरीं ची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचाच परिणाम म्हणून कमाल तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) पासून पुढील (Pune)तीन दिवस किनारपट्टीवगळता राज्यात हलक्या सरींचा अंदाज आहे. प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

पुढील पाच दिवस राज्यभरात ढगाळ हवामान राहून कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

Alandi: गुढीपाडव्या निमित्त माऊली मंदिरात भाविकांची गर्दी

राज्यभरात काहीसे ढगाळ हवामान तयार झाल्यामुळे कमाल तापमान चाळिशीच्या आत आले आहे. सोलापूर 42 आणि मालेगाव 41.8 अंशावर पारा आहे. राज्यात सरासरी पारा 35 ते 39  अंशांवर आहे, विदर्भात तापमानात चांगली घट झाली असून पारा 37 अंशांवर आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरी 39 अंशांवर तापमान आले आहे. किनारपट्टीवर पारा सरासरी 33.5 अंश सेल्सिअसवर आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.