Crime News : दोन आरोपींकडून अडीच लाखांचा गुटखा जप्त;पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा पाचची कारवाई

एमपीसी न्यूज – दोन आरोपींना अटक करत पोलिसांनी त्यांच्याकडून अडीच लाखांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई मुकाई चौका जवळ पिंपरी – चिंचवड आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा (Crime News) पाचच्या पथकाने केली आहे.

 

सुरेश मोहनलाल बिश्नोई (वय19 रा.किवळे), आसुराम चुनाराम बिश्नोई (वय 30 रा. किवळे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर सरवन बिश्नोई हा फरार आहे.

Pune Crime News : चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच! निवृत्त अधिकाऱ्याचे घर फोडले, 67 तोळे दागिने लंपास

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाकडून बंदी असतानाही बेकादिशीररीत्या गुटखा विक्री होत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस नरीक्षक रामदास इंगवले यांनी तपास पथक तयार करून मुकाई चौक ते विकास नगरकडे जाणाऱ्या रोडजवळील एका बांधकाम सुरु असलेल्या बिल्डींग जवळ छापा (Crime News) मारला.यावेळी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले.कारवाईत पोलिसांनी 2 लाख 43 हजार 662 रुपयांचा गुटखा, 30 हजार रुपयांची दुचाकी व साडे सहा लाखाची कार असा एकूण 9 लाख 23 हजार 172 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढिल तपास देहुरोड पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.